आषाढी वारी 2025 : पुण्यात २१ हजारांहून अधिक वारकऱ्यांना वैद्यकीय मदत
PMC कडून २४x७ आरोग्य सेवा
पुणे (२१ जून २०२५) : संत तुकाराम महाराज पाळखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आरोग्य सेवेसाठी भक्कम आणि कार्यक्षम व्यवस्था उभी केली आहे. वारीच्या पहिल्या दोन दिवसांत ५७० वारकऱ्यांना प्रत्यक्ष उपचार, तर आजच्या दिवसभरात तब्बल २१,१५१ वारकऱ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले आहेत. महापालिकेच्या ३८ फिरत्या वैद्यकीय पथकांद्वारे रस्त्यावरच प्राथमिक उपचार दिले गेले. तर ‘डायल १०८’ रुग्णवाहिका सेवेने ३६९ रुग्णांना रुग्णालयात मोफत हलवण्यात आले. (pune pmc free medical help ashadhi wari 2025)
व्हिडिओ : दिव्यांग फूड डिलिव्हरी बॉय आरबाज शेख बनला ‘वारकरी’
✅ मुक्कामी ठिकाणी २४x७ आरोग्य सेवा
वारकऱ्यांच्या मुक्कामी ठिकाणी — भावनी पेठ, नाना पेठ, सोमवार पेठ येथे २४ तास वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
🔹 महिलांसाठी स्वतंत्र सुविधा
हिरकणी कक्ष : स्तनपान व विश्रांतीसाठी, स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती,फिजिओथेरपी सेवा
रस्त्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन
पिण्याचे पाणी, चलतं शौचालय, औषधे व डॉक्टरांची उपलब्धता
🧘♂️ वारकऱ्यांचा प्रतिसाद