पालखी मार्गावर 72 ठिकाणी धोका कायम; महापालिकेपुढे मोठे आव्हान
महापालिका आय़ुक्त नवल किशोर राम यांनी केली पावसात पाहणी
पालखी सोहळा 2025 पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात येण्यास आता अवघे सात दिवस शिल्लक असताना पुणे पालखी मार्ग रस्त्यांची स्थिती चिंताजनक आहे. (स्त्यांची दुरुस्ती) रस्त्यांवरील असंख्य खड्डे, तुटलेली चेंबर झाकणे, लोंबकळणाऱ्या केबल्स आणि असमान रस्ते यामुळे लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात पुणे पोलिस आयुक्तांनी पुणे महापालिकांना पत्रा लिहून उपाय करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी खाते प्रमुखांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शुक्रवारी सांयकाळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम पालखी मार्गावर पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी मुसळधार पावसात पाहणी केली. तसेच प्रशासाना सूचना केल्या आहेत. (pune palkhi marg road condition 72 danger spots 2025)
महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !
महापालिकेकडून (पुणे महापालिका) रस्त्यांची सुधारणा सुरू असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे या धोकादायक ठिकाणांची यादी सादर केली होती. त्यानुसार ५० ठिकाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतात. या यादीची प्रत महापालिकेला मिळाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभाग व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलेल्या मुद्यांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे ३ दिवसात पूर्ण करून सर्व शासकीय यंत्रणाशी विशेषत: पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवून पालखी सोहळा उत्तम पद्धतीने पार पडेल यासाठी दक्ष राहावे असे मा आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
2025 ची नवी प्रभाग रचना : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मोठा निर्णय
अशा आहेत रस्त्यांवरील समस्या
विश्रांतवाडी ते हडपसर आणि कुंजीरवाडी या मार्गावर सुमारे ६० हून अधिक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे, राडारोडा, तुटलेली चेंबरची झाकणे, लोंबकळणाऱ्या केबल्स, धोकादायक झाडांच्या फांद्या आणि साचलेले सांडपाणी दिसून येते. या अडथळ्यांमुळे वारकऱ्यांच्या चालण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ( PMC उपाययोजना)
प्रमुख ठिकाणांवरील स्थिती
- बोपखेल फाटा ते दत्तमंदिर : खड्डे, पाणी साचणे, तुंबलेले चेंबर, लोंबकळणाऱ्या केबल्स.
- हॅरिस पूल ते संचेती रुग्णालय : राडारोडा, ड्रेनेज तुंबलेले.
- वाकडेवाडी ते सीओईपी परिसर : उघडी चेंबर झाकणे, खड्डे.
- संचेती चौक ते पालखी विसावा : मेट्रो कामामुळे राडारोडा व मार्ग बंद.
- हर्डीकर रुग्णालय परिसर : खड्डे, गायब चेंबर झाकणे.
- लक्ष्मी रस्ता : खड्डे व लोंबकळणाऱ्या केबल्स.
शहरात विविध प्रकल्पांचे काम सुरू असल्याने काही अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र महापालिकेकडून तातडीने उपाययोजना सुरू असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. “वारकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (वारकरी सुरक्षा)