पुण्यातील ३७ धोकादायक वाड्यांची वीज आणि पाणी पुरवठा तोडणार
पुमे महापालिकेचा मोठा निर्णय
व्हिडिओ : दिव्यांग फूड डिलिव्हरी बॉय आरबाज शेख बनला ‘वारकरी’
शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये अनेक जुने वाडे आहेत. अनेक वाडे लाकूड, माती आणि जुन्या बांधकाम पद्धतीने उभारले गेले असून, पावसाळ्यात त्यांचे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून वाड्यांचे सर्वेक्षण करून ११६ वाड्यांना धोकादायक घोषित करण्यात आले. त्यापैकी ७६ वाड्यांचे बांधकाम काढून टाकण्यात आले असून उर्वरित वाड्यांपैकी काही मालकांनी सहकार्य दर्शवले आहे. मात्र ३७ वाड्यांबाबत अद्यापही विरोध कायम आहे.
सर्वाधिक धोकादायक वाडे रविवार पेठेत
महापालिकेच्या अहवालानुसार, सर्वाधिक ९ वाडे रविवार पेठेत धोकादायक स्थितीत आहेत. यानंतर भवानी पेठ, शुक्रवार पेठ, आणि घोरपडी पेठेत प्रत्येकी ५ वाडे, बुधवार पेठेत ४, नाना पेठेत ३, तर सदाशिव पेठ, गुरुवार पेठेत प्रत्येकी २ वाडे धोकादायक ठरले आहेत. शनिवार पेठेत ही एक वाडा यादीत आहे.
पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली
महापालिकेचा इशारा – कारवाई अपरिहार्य
“धोकादायक वाडे रिकामे करण्यासाठी वीज आणि पाणी जोडणी तोडण्यात येणार आहे. वारंवार चर्चा करूनही विरोध कायम असल्यामुळे ही कारवाई आवश्यक झाली आहे.”
– राजेश बनकर, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका