पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) उमेदवारांच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरातील विविध भागांत इच्छुक उमेदवार तयारी करत असताना, काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला जोर आला आहे. या चर्चेमुळे भाजपमधील स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पक्षातील काही कार्यकर्त्यांनी “बाहेरील पक्षातील संधीसाधू लोकांना उमेदवारी देण्यापेक्षा वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी” अशी मागणी वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्या अनिता जावळकर यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मंडळ अध्यक्ष यांना पत्र पाठवले आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.