पुणे जिल्ह्यात 115 नवीन आधार नोंदणी केंद्रांना मंजुरी – 2025 अपडेट
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत काढली सोडत
पुणे : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आधार नोंदणी सेवेत मोठी भर पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नवीन आधार नोंदणी केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 356 अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी 272 अर्ज पात्र ठरले. (pune aadhar enrollment center approval 2025)
पालखी मार्गावर 72 ठिकाणी धोका कायम; महापालिकेपुढे मोठे आव्हान
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 12 जून रोजी पात्र अर्जदारांसमोर लॉटरी (सोडत) पद्धतीने आधार संच वितरण प्रक्रिया पार पडली. या सोडतीत 115 पात्र अर्जदारांना अटी व शर्तीच्या अधीन राहून नवीन आधार नोंदणी संच मंजूर करण्यात आले. (pune aadhar enrollment center approval 2025)
विभागानुसार मंजूर आधार केंद्रांची संख्य
ग्रामीण भाग : 65 रिक्त केंद्रांसाठी 62 अर्जदारांना मंजुरी.
नगर परिषद कार्यक्षेत्र : 7 रिक्त केंद्रांसाठी सर्व 7 अर्जदारांना मंजुरी.
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्र : 22 रिक्त केंद्रांसाठी 22 अर्जदारांना मंजुरी.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्र : 28 रिक्त केंद्रांसाठी 24 अर्जदारांना मंजुरी.
सोडतीवेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपजिल्हाधिकारी तथा आधार नोडल अधिकारी पल्लवी घाटगे आणि आधार संच वितरण समितीचे सदस्य उपस्थित होते.