...

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून अनोख्या शुभेच्छा !

ड्रोन शोने उजळणार पुण्याचे आकाश

पुणे (प्रतिनिधी) : देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि जागतिक पातळीवर भारताचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस (१७ सप्टेंबर) देशभरात ‘सेवा पंधरवड्या’च्या विविध उपक्रमांद्वारे साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला १६ सप्टेंबर रोजी पुण्यात एक आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे.

 

MHADA Pune Lottery 2025 । पुण्यात परवडणारी घरे मिळवण्याची मोठी संधी ; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

 

या दिवशी ड्रोन शो, दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनी यांचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विशेष ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून होत आहे.

 

 

मोहोळ यांनी सांगितले की, “मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हजारो ड्रोन आकाशात झेपावतील आणि विकसित भारताच्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडवतील.”हा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी स.प. महाविद्यालय मैदान होणार आहे, असे सांगितले.

 

UIDAI चा नवा नियम : आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यावर मर्यादा ; कितीवेळा बदल करता येईल जाणून घ्या..

 

मोहोळ म्हणाले, “२६ मे २०१४ रोजी संसद पायरीवर नतमस्तक झालेले मोदी आज देशाला ‘राष्ट्रहित सर्वात महत्वाचे’ हा मंत्र देतात. करोनाकाळात मोफत लस पुरवण्यापासून ते अवकाश धोरणांपर्यंत, तसेच देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्यापर्यंत त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचा वाढदिवस पुण्यातील ड्रोन शोमुळे ऐतिहासिक ठरणार आहे.”

 

 

या कार्यक्रमाबरोबरच पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देणार आहेत. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची पोस्टकार्ड स्वरूपातील शुभेच्छा थेट पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहेत.

 

ड्रोन शोची वैशिष्ट्ये

* अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात प्रथमच ड्रोन शो
* ४५ मिनिटांचा थ्रीडी शो, हजारो ड्रोन्स सहभागी
* मोदी सरकारच्या कामगिरीचे थ्रीडी सादरीकरण
* पुण्याचे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दर्शन
* विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन
* ३-४ किलोमीटर परिसरातून सहज पाहता येणार शो

 

 

 

Local ad 1