पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा..! पण, “ही” अपेक्षाही केली व्यक्त

मुंबई Mumbai News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! (Deputy Chief Minister Ajit Pawar wishes Prime Minister Narendra Modi ..!)  महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना समान न्याय, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचे काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

भारतासारख्या महान देशाचे पंतप्रधान होण्याचं भाग्य आपल्याला दोनदा लाभलं आहे. स्वतंत्र भारतात जन्म झालेले आपण देशाचे पहिले पंतप्रधान आहात. पंतप्रधानपदी झालेली फेरनिवड ही देशवासियांच्या विश्वासाचं, अपेक्षांचं प्रतिक आहे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करुन त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचं बळ आपणास मिळो. पंतप्रधान म्हणून आपल्या नेतृत्वाखाली देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व, संविधान, लोकशाही व्यवस्था अबाधित राहो. देशातील महागाई, बेरोजगारी, कोरोनासह आर्थिक, सामाजिक संकटांवर यशस्वीपणे मात करुन देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यात आपणास यश मिळो, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांना दिल्या आहेत. (Deputy Chief Minister Ajit Pawar wishes Prime Minister Narendra Modi)

 

 

महाराष्ट्रातील जनतेच्याही पंतप्रधान म्हणून आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षांची पूर्तता होईल. महाराष्ट्राला तसेच समस्त देशवासियांना समान न्याय, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचं काम आपल्याकडून होईल, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.

 

 

Local ad 1