...

yellow alert। नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाचा यलो अलर्ट – मुसळधार पावसाचा इशारा

नांदेड, दि. 23 सप्टेंबर : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात 23, 24, 25 आणि 27 सप्टेंबर 2025 या चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (nanded yellow alert september 2025)

 

Pune Grand Challenge 2026। पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार

 

23 व 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर 26 व 27 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणा व नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 

Diwali vacation 2025। शाळांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी

 

 

✔️ नागरिकांनी घ्यावयाची काळजी

  • विजांचा कडकडाट सुरू असल्यास घराबाहेर जाणे टाळा.
  • मोकळ्या जागेत असाल तर सखल भागात गुडघ्यात डोके घालून बसा.
  • घरातील विद्युत उपकरणे त्वरित बंद करा.
  • तारांचे कुंपण, विजेचे खांब, लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.
  • पाण्यात उभे असाल तर त्वरित बाहेर पडा.

❌ करू नये अशा गोष्टी

  • विजा चमकत असताना घरातील लँडलाईन फोन वापरू नका.
  • शॉवरखाली अंघोळ करू नका.
  • नळ, पाईपलाइन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंना स्पर्श करू नका.
  • धातूच्या शेड, तंबू किंवा झाडाखाली आसरा घेऊ नका.
  • उघड्या खिडकीतून किंवा दारातून वीज पाहू नका. 
Local ad 1