महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर
पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (MASMA) ची वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापूर येथे उत्साहात पार पडली. राज्यभरातील १०० हून अधिक सौर ऊर्जा उद्योजकांनी या सभेला हजेरी लावली. यामध्ये नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. (maharashtra solar manufacturers association new committee 202)
राज्य सरकारचा ‘प्रभागराज’ ! महापालिकांच्या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा डाव?
मास्माचे तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी गतवर्षीच्या उपक्रमांचा आढावा घेतला, तर कोषाध्यक्ष समीर गांधी यांनी आर्थिक अहवाल सादर केला, जो सर्वसाधारण सभेने संमतीने स्वीकारला. नवीन MASMA कार्यकारणी : अध्यक्ष: अमित कुलकर्णी (नाशिक), उपाध्यक्ष: प्रदीप खाडे (कोल्हापूर), सचिव: सहज मुथा (पुणे), कोषाध्यक्ष: चिन्मय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
सभेला महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोकण, विदर्भ व मराठवाड्यातील सदस्यांनी सहभाग नोंदवला. महिला उद्योजकांनीही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
MASMA संचालक मंडळातील समीर गांधी, भर्तेश धूली, राजेंद्र पांचाल, नितीन कुलकर्णी, मनीषा बारबिंद आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी संस्थेच्या विकासदृष्टीकोनावर भाष्य करत नवकल्पना मांडल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पांडे व अतुल होनोलें यांनी केले. आयोजनात कोल्हापूर टीमसह नितीन कुलकर्णी, प्रदीप खाडे, धनाजी एकल यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.