...

महाराष्ट्रातील १२ अधिकारी झाले IAS : केंद्र सरकारची यादी जाहीर”

मुंबई : केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्रातील १२ राज्यसेवा अधिकाऱ्यांची २०२४ साठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये पदोन्नतीसाठी निवड झाली आहे. ही पदोन्नती १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत निर्माण झालेल्या रिक्त जागांसाठी आहे.

 

महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !  

 

 

या अधिकाऱ्यांची निवड IAS (भरती) नियम१९५४ अंतर्गत, राज्य सरकारच्या संमतीने आणि युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) शिफारशीनुसार करण्यात आली आहे.

 

 

 

IAS पदोन्नती यादी २०२४ (महाराष्ट्र संवर्ग)

  • विजयसिंह शंकरराव देशमुख
  • विजय साहादेव भाकरे
  • त्रिगुण शामराव कुलकर्णी
  • गजानन धोंडीराम पाटील
  • महेश भास्करराव पाटील
  • पंकज संतोष देवरे
  • मंजीरी मनोलकर
  • आशा अफझल पठाण
  • राजलक्ष्मी शफिक शाहा
  • सोनाली निलकंठ मुळे
  • गजेंद्र चिंतामनराव बवणे
  • प्रतिभा समाधान इंगळे

 

या सर्व अधिकाऱ्यांची पदोन्नती महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ गट-अ (Group-A) मधून करण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती ओए क्रमांक 236/2021 आणि 237/2021 तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांच्या अंतिम निकालावर अवलंबून राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

Local ad 1