...

“12वी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 12 जानेवारीपासून HSC Hall Ticket ऑनलाईन – लगेच तपासा”

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12वी (HSC) परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे सोमवार, 12 जानेवारी 2026 पासून अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in, www.mahahsscboard.in वरून Admit Card लिंकद्वारे डाउनलोड करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना Hall Ticket थेट स्वतः डाउनलोड करता येणार नाही. संबंधित शाळा / कॉलेजनेच ते प्रिंट करून, त्यावर मुख्याध्यापक / प्राचार्य यांची सही व शिक्का देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. (hsc 12th exam 2026 hall ticket download mahahsscboard)

 

 

“पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका ! 

 

 कोणाला Hall Ticket मिळणार?

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा Status – “Paid” आहे, त्यांचे प्रवेशपत्र **Paid Status Admit Card** या पर्यायातून उपलब्ध होईल. उशिरा अर्ज भरलेले किंवा Extra Seat Number दिलेले विद्यार्थी Extra Seat No Admit Card पर्यायातून Hall Ticket मिळवू शकतील. जर कोणत्याही विद्यार्थ्याच्या नावात, आईच्या नावात, जन्मतारखेत किंवा इतर तपशीलात चूक असेल, तर ती Application Correction लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्त करता येईल. सुधारित प्रवेशपत्र Correction Admit Card लिंकद्वारे मिळेल.फोटो अस्पष्ट किंवा चुकीचा असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का आवश्यक आहे.

 

 

Hall Ticket हरविल्यास, शाळेकडून पुन्हा प्रिंट काढून “Duplicate” असा लाल शाईत उल्लेख करून देण्यात येईल. मंडळाने स्पष्ट केले आहे की प्रवेशपत्र प्रिंट करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये.

 

 

 

 

 

 

❓ FAQ – प्रश्न उत्तर

Q1. 12वी परीक्षेचे Hall Ticket कधी उपलब्ध होतील?

👉 12 जानेवारी 2026 पासून.

Q2. Hall Ticket कुठे मिळेल?

👉 www.mahahsscboard.in, www.mahahsscboard.in  या वेबसाइटवर Admit Card लिंकवर.

Q3. विद्यार्थी स्वतः Hall Ticket डाउनलोड करू शकतात का?

👉 नाही. शाळा / कॉलेजमार्फतच Hall Ticket दिले जातील.

Q4. Hall Ticket साठी पैसे द्यावे लागतील का?

👉 नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क घेण्यास मनाई आहे.

Q5. नाव किंवा जन्मतारखेत चूक असल्यास काय करावे?

👉 Application Correction लिंकद्वारे ऑनलाइन दुरुस्ती करावी.

 

 

Local ad 1