गुजरातच्या दिशेने जाणारे गोवा बनावटीचे मद्य जप्त

ठाणे : उच्च प्रतीच्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (गोवा निर्मित) गुजरातकडे जात असताना ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केले आहे.  या कारवाईमुळे बेकायदा मद्यविक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. (Goa-made liquor heading towards Gujarat seized in Mumbai)

 

 

राज्य उत्पादन शुल्क, विभागाला मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी गुजरात हायवेवर, भिवंडी-चिंचोटी रोडवर, खाडीच्या पुलावर, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गुजरात दिशेने जाणार्‍या आयशर टेम्पो क्र.जीजे 06- बीटी 2021 पाठलाग करून ताब्यात घेतला. त्यामध्ये परराज्यातील उच्च प्रतीच्या भारतीय बनावटीचे विदेशी मद्य (गोवा निर्मित) जप्त करण्यात आले. तसेच त्यासोबत काही केमिकल्सचे भरलेले ड्रम व कॅन देखील मिळून आले.   (Goa-made liquor heading towards Gujarat seized in Mumbai)

 

दरम्यान, हा कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप (State Excise Commissioner Kantilal Umap), विभागीय उपायुक्त सुनिल चव्हाण (Divisional Deputy Commissioner Sunil Chavan), अधीक्षक निलेश सांगडे (Superintendent Nilesh Sangde), उपअधीक्षक चारूदत्त हांडे (Deputy Superintendent Charudatta Hande) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.  (Goa-made liquor heading towards Gujarat seized in Mumbai)

Local ad 1