पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांचे भागधारकांना उद्देशून पत्र

पुणे : पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी भागधारकांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे, ज्यात त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, कंपनी पुढील ६ तिमाहींमध्ये ईबीआयटीडीए (व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई) ब्रेकइव्हन संपादित करेल. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

 

 

 

”आम्हाला आमच्या व्यवसायाची गती, उत्पंन्नाचे प्रमाण आणि कार्यसंचालनामधून मिळणा-या लाभामुळे प्रोत्साहन मिळाले आहे. आम्ही ही गती कायम राहण्याची अपेक्षा करतो आणि माझा विश्वास आहे की, आम्ही बहुतांश विश्लेंषकांच्या अंदाजांपूर्वीच पुढील ६ तिमाहींमध्ये (म्हणजेच ईएसओपी खर्चापूर्वी ईबीआयटीडीए व सप्टेंबर २०२३ रोजी संपणा-या तिमाहीपर्यंत) ईबीआयटीडीए ब्रेकइव्हेनचे कार्यसंचालन पाहू. महत्त्वाचे म्हणजे आम्ही आमच्या कोणत्याही विकास योजनांमध्ये तडजोड न करता हे संपादित करणार आहोत,” असे त्यांनी पत्रात नमूद केले. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

 

 

 

पेटीएमकडून प्रबळ कामगिरीसह आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीची सांगता कंपनीने मासिक व्यवहार करणारे युजर्स, ऑफलाइन पेमेण्ट्स व डिवाईसेसची अंमलबजावणी किंवा भागीदार-आधारित कर्ज सुविधा अशा त्यांच्या सर्व व्यवसाय विभागांमध्ये प्रबळ वाढीची नोंद केली. तसेच पेटीएमने सांगितले की, त्यांच्या सुपर अॅप ऑफरिंग्जमुळे युजर सहभागामध्ये उच्च वाढ दिसण्यात आली आहे. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

 

 

 

पेटीएमला कंपनीच्या एक्चेंजेससोबत शेअर केलेल्या अपडेटनुसार आर्थिक वर्ष २२ च्या शेवटच्या तिमाहीमध्ये प्रचंड वाढ दिसण्यात आली आहे. तिमाहीमदरम्यान कर्ज वितरणांमध्ये ६.५ दशलक्षांपर्यंत वाढ (वार्षिक ३७४ टक्के वाढ) झाली, ज्यामध्ये एकूण कर्ज मूल्ये ३,५५३ कोटी रूपये (वार्षिक ४१७ टक्के वाढ) होते, जीएमव्ही वार्षिक १०४ टक्यांच्या वाढीसह २.५९ लाख कोटी रूपयांपर्यंत (३४.५ बिलियन डॉलर्स) पोहोचला आणि मासिक व्यवहार करणा-या युजर्सची संख्या ४१ टक्यांच्याप वाढीसह ७०.९ दशलक्षांपर्यंत पोहोचली. पेटीएमने ऑफलाइन पेमेण्ट्स व्यवसायामध्ये अग्रस्थान कायम राखले आहे, सोबतच अलवंब करण्यात आलेल्या डिवाईसेसची एकूण संख्या २.९ दशलक्षांपर्यंत वाढली. रोचक बाब म्हणजे कंपनीने सांगितले की, प्रतिदिन १००० डिवाईसेस त्यांच्या सेवेचा लाभ घेतात. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

 

 

आपल्या पत्रामध्ये कंपनीच्या शेअर किंमतीचा देखील उल्लेख केला आणि म्हणाले की, ते दीर्घकालीन भागधारक मूल्य निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहेत. ”जागतिक स्तरावर उच्च विकसित स्टॉक्ससाठी अस्थिर बाजारपेठ स्थितींमुळे आमचे शेअर्स आयपीओमध्येय लक्षणीयरित्या घसरले आहेत; तरीदेखील खात्री देतो की संपूर्ण पेटीएम टीम यशस्वी , लाभदायी कंपनी निर्माण करण्याप्रती आणि दीर्घकालीन भागधारक मूल्य निर्माण करण्याणप्रती कटिबद्ध आहे. याच अनुषंगाने आमच्यार मार्केट कॅपने स्थिररित्या आयपीओ पातळी पार केल्यानंतरच मला स्टॉक ग्रॅण्ट्स दिले जातील.” (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

शर्मा यांनी पेटीएममध्ये प्रबळ नेतृत्वे टीम तयार करण्याबाबत देखील मत व्यक्त केले. ”आमच्या कंपनीमध्ये असलेल्यां टॅलेण्टचा आणि महत्त्वाकांक्षी व उद्योजकता असण्याच्या आमच्या संस्कृतीचा मला अभिमान वाटतो. आम्ही तंत्रज्ञान व आर्थिक उद्योगक्षेत्रांमधून उत्तम प्रतिभा असलेल्या आमच्या टीममध्ये वाढ करत राहू,” असे त्यांनी नमूद केले. (Paytm CEO Vijay Shekhar Sharma’s letter to shareholders)

Local ad 1