पुणे-मुंबई महामार्गावर गोवा बनावटीच्या दारुचे 450 बाॅक्स जप्त

पुणे : महाराष्ट्रापेक्षा गोव्यात दारु स्वस्त मिळते, त्यामुळे गोव्यात तयार झालेल्या दारुची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक होत आहे. त्यावर उत्पादन शुल्क विभागाची करडी असून, गोवा बनावटीच्या दारुची जुने मुंबई- पुणे महामार्गावरुन (Pune-Mumbai highway) वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभागाला मिळाली होती. (State Excise Talegaon Dabhade Division) त्यानुसार लावलेल्या सापळ्यात तस्कर अलगदपणे सापळ्यात अडकला. त्यांच्याकडून दारुचे 450 बाॅक्स आणि एक चार चाकी वाहन जप्त केले आहे. (450 boxes of Goa-made liquor seized on Pune-Mumbai highway)

 

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत जुनो पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल बगीचा समोर (ता. मावळ जि. पुणे) अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. (450 boxes of Goa-made liquor seized on Pune-Mumbai highway) त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. सशंयित टेम्पो क्रमांक MH 07 AJ 8460 या वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये गोवा राज्य निर्मित, गोवा राज्य विक्रीकरिता असलेले व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस बंदी असलेले विदेशीमद्याचे ४५० बॉक्स मध्ये ७५० मिली क्षमतेच्या ५४०० बाटल्या मिळून आल्या. एकनाथ बाबली लोके (वय – २५, वर्षे रा तळवडे, ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) (Sawantwadi, District Sindhudurg) याला मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८१,८३, ९० नुसार अटक करण्यात आली. (He was arrested under Section 65 (a) (e) 81,83,90 of the Bombay Prohibition Act, 1949.)

 

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, (State Excise Commissioner Kantilal Umap) उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, अपअधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सराफ, प्रवीण शेलार, दुय्यम निरीक्षक डी. बी. सुपे, स्वाती भरणे, प्रवीण देशमुख, आर. व्ही.झोळ, सागर धुर्वे, रवि लोखंडे, जवान अक्षय म्हेत्रे, तात्याबा शिंदे, रणजीत चव्हाण, राहुल जौंजाळ, शिवाजी गळवे, रसूल काद्री, हनुमंत राऊत यांनी केली. (450 boxes of Goa-made liquor seized on Pune-Mumbai highway)

Local ad 1