टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे निधन

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला आहे. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालघर जिल्हा अधीक्षकांनी दिली आहे. (Former Chairman of Tata Udyog Group Cyrus Mistry passed away)

 

 

सायरस मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारशी कुटुंबात झाला. उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 2006 साली ते  टाटा  समुहाचे सदस्य बनले. 2013 साली वयाच्या 43 व्या वर्षी टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. परंतु, 2016 साली वादानंतर मिस्त्री यांना टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले. (Former Chairman of Tata Udyog Group Cyrus Mistry passed away)

 

Local ad 1