वाळू माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आखला प्लॅन
पुणे : जिल्ह्यातील नदीपात्रातून बेसुमार रेती उपसा (sand lift) केला जात असून, आता नांदेडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांची नजर वाळू माफियांकडे वळवली आहे. अवैध रेती उपसा (Illegal sand mining) आणि वाहतूक करताना आढळल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (Section 144 of the Code of Criminal Procedure 1973) अन्वये कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, मांजरा, लेंडी या नदी (River Godavari, Panganga, Manjra, Lendi) पात्राच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांमार्फत नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन व तीच रेती अवैध वाहतुकीद्वारे उपलब्ध होत असल्याचे आढळून येत आहे. त्याला महसूल विभागातील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पाठबळ मिळत असल्याने वाळू माफियाचे मनोबल वाढले असून, दिवसाढवळ्या रेती उपसा करून वाहतूक करतात. (The district collector made a plan to break the back of the sand mafia)