समृद्धी महामार्ग कधी सुरु होणार ?  राधेश्याम मोपलवार यांनी दिली महत्त्वाची माहिती..

Samruddhi Highway : राज्य सरकार दिवाळीपूर्वीच (Diwali) समृद्धी महामार्गाचे गिफ्ट (Gift) देण्याची शक्यता आहे. आजपर्यंत तारीख पे तारीख सुरु असून, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्घाटनापुर्वीच बाळासाहेबांची शिवसेनाचे (Balasahebanchi ShivSena) नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांनी उद्घाटना पुर्वीच समृद्धी महामार्गावरुन वाहने चालविल्याने जोरदार टीका झाली होती. (When will Samriddhi Highway start?)

 

नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) समृद्धी महामार्ग  (Samruddhi Mahamarg) सुरु करण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.  दिवाळीपूर्वी म्हणजे येत्य 23 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (When will Samriddhi Highway start?)

 

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर (Capital Mumbai and Sub-Capital Nagpur) यांना एकमेकांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग बांधण्यात आला आहे. नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गाचा (Nagpur – Shirdi Samriddhi Highway)  MSRDC चे एमडी राध्येशाम मोपलवार (Radhyesham Mopalwar) यांनी गुरूवारी आढावा घेतला. समृद्धी महामार्गावर सुरक्षा, टोल नाके, रुग्णवाहिका , स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, सुरक्षा रक्षक आदींचा मोपलवार यांकडून आढावा घेण्यात आला.

 

दिवाळीपूर्वीच म्हणजे येत्या 23 ऑक्टोबर ला नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. अनेकदा तारीख देऊनही समृद्धीचं लोकार्पण होऊ न शकल्याने लोकार्पणाची नवीन तारीख जाहीर करण्यात गोपनीयता पाळण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.

 

 

दरम्यान शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग कधी सुरू होणार?  या प्रश्नावर मोपलवार म्हणाले, आम्ही तयार आहोत, हा महामार्ग 100 टक्के वाहतुकीसाठी सुरू करता येऊ शकतो. मात्र महामार्ग सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेणार असल्याने आपल्याला त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही, असे उत्तर दिले.

 

 सरकारकडून यापूर्वीच ऑक्टोबर 2021, 31 डिसेंबर 2021 आणि आता 31 मार्च 2022 ही तारीख देण्यात आली होती. पण अजूनही समृद्धी महामार्गाचं काम अपूर्ण असल्याची माहिती आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (When will Samriddhi Highway start?)

Local ad 1