Sand mafia attacks । वाळू माफियांचा शेतकऱ्यांवर प्राणघात हल्ला

नांदेड : गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा (Sand extraction from Godavari river basin) करुन वाहतूक केली जात असल्याने परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. वाळू तस्करांना रोखण्यासाठी पुढे आलेल्या शेतकरी कुटुंबावरच तस्करांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्लात तिघे जखमी झाले. त्यांच्यावर नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Sand mafia attacks farmers in Nanded district)

 

 

 

ही घटना शुक्रवारी (दि. २५ मार्च) दुपारी एकच्या दरम्यान घडली. दरम्यान, या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात (At Usmannagar Police Station) फिर्यादी पांडुरंग भरकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केशव ढेपे, संदिप ढेपे (रा. मारतळा), गोविंद जाधव, संजय जाधव, धनराज जाधव, मधुकर जाधव (रा. चिंचोली), संभाजी येडे, मारुती येडे, राजु येडे, दत्ता येडे (रा. कामळज) कामाजी भरकडे, देवराव भरकडे (रा. कौडगाव ) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Sand mafia attacks farmers in Nanded district)

 

 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोहा तालुक्यातील कामळज येथे वाळु वाहतूक करणाऱ्या टिप्परमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर धुळ उडून पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी, लोहा तहसीलदार व कंधार विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. कामळज नदीपात्रातून तराफ्याच्या सहाय्याने राजरोसपणे वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे येथील शेतकरी पांडुरंग बालाजी भरकडे, मारुती संभाजी भरकडे, बळीराम संभाजी भरकडे या बागायतदार शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. २५) रोजी रस्त्यावर पाणी टाकून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी वाळूची वाहतुकीला विरोध केला. यामुळे चिडलेल्या वाळू माफियांच्या गटाने तीन शेतकऱ्यांवर पाठलाग करुन लोखंडी रॉड, टॉमी व कुऱ्हाड, व्हीलपाना, लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात माजी सरपंच बळीराम भरकडे त्यांचे भाऊ मारुती भरकडे व पुतण्या पांडुरंग भरकडे जखमी झाले आहेत.  (Sand mafia attacks farmers in Nanded district)

 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते करत आहेत. (Sand mafia attacks farmers in Nanded district)

Local ad 1