जिल्हा प्रशासन अलर्ट : नांदेड जिल्ह्यात सहा तालुक्यातील गावे लम्पी बाधित घोषित

नांदेड : जिल्ह्यातील लम्पी आजारावर (Lumpy disease) नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन (District Administration) अलर्ट (Alert) झाले आहे. धर्माबाद तालुक्यातील (Dharmabad Taluka) करखेली, चिंचोली बिलोली तालुक्यातील (Biloli Taluka) आरळी, बावलगाव तसेच माहूर (Mahur Taluka) तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील (Loha taluka) कलंबर भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील (Himayatnagar Taluka) करंजी या गावात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिसून आल्याने ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. (Villages in six talukas in Nanded district declared lumpy affected)

 

प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 (Prevention and Control of Infectious and Communicable Diseases Act 2009) अन्वये जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  (Collector Abhijit Raut) यांनी जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील चोंडी, कारेगाव बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, कांगठी, भोसी तसेच लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डिसीज ची लागण झाल्याचा रोग निदान अहवाल सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे यांच्याकडून प्राप्त झाला आहे.धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहुर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर, भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील पशुधनामध्ये लम्पी स्किन डीसीजची लक्षणे आढळून आली आहेत. (Villages in six talukas in Nanded district declared lumpy affected)

 

भारत सरकारचा (Government of India) पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग तसेच पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांनी रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत (Collector and Chairman of Disaster Management Authority Abhijit Raut) यांनी पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. लम्पी स्किन रोग प्रादुर्भावग्रस्त व बाधीत झालेली धर्माबाद तालुक्यातील करखेली, चिंचोली व बिलोली तालुक्यातील आरळी व बावलगाव व माहूर तालुक्यातील पापलवाडी लोहा तालुक्यातील कलंबर, भोकर तालुक्यातील नांदा, पाळज, रायखोड हिमायतनगर तालुक्यातील करंजी ही गावे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. (Villages in six talukas in Nanded district declared lumpy affected)

अशा दिल्या सूचना…

रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधीत जनावरे वगळता इतर जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. बाधीत गावामध्ये जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगानेग्रस्त पशुधनाचा मृत्यु झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. (Villages in six talukas in Nanded district declared lumpy affected)

 

 

जनावरांच्या काळी घ्या…

बाधीत परिसरामध्ये स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी, रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी, लम्पी स्किन रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांचेमार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी असे सांगितले आहे.
Local ad 1