स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या म्हणून.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यात लवकरच महापालिकांच्या निवडणुका होतील. या आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे, त्यांनीही सहा सात वर्षे तयारी केलेली असते, त्यामुळे अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगळे लढू पण एकमेकांवर टीका करणार नाही, अशा ठिकाणी सामजस्यानेच निवडणुकांना सामोरे जाऊ असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Chief Minister Devendra Fadnavis’ big statement regarding local body elections)
पुण्यात काय पण होई शकते ! ठेकेदाराने पुणे महापालिकेला मागितली 79 कोटींची नुकसान भरपाई
पुण्यातील यशदा (
yashada pune) येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकारी (Municipal Commissioner, Chief Officer of Municipal Council) यांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आम्हाला महापालिकेच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवायचे आहे. आम्ही तिघे एकत्र असून, अपवादात्मक काही ठिकाणी वेगळे लढू की जेथे खुप तुल्यबळ लढत आहे. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. कार्यकर्त्यांचेही स्वाभाविक आहे आम्ही सहा सहा सात वर्षे काम करतो ही आम्हाला संधी आहे, ही कार्यकर्तयांची भूमिका आम्ही तिन्ही पक्ष जाणून आहोत. त्यामुळे जेथे स्वाभाविक युती होणे शक्य आहे, तेथे युती म्हणून लढू. पण् जेथे कठीण परिस्थिती आहे, तेथ् वेगळे लढलो तरी पण एकेमकांवर टिका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. व “पोस्ट पोल” नंतर आम्ही एकत्र येणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या सूचना केल्या आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री यांना विचारलं असता त्यांनी, निर्धारित वेळेत निवडणुका घेण्यात मला काहीच अडचण वाटत नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, आम्ही वेळेत निवडणूक व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र जिथे मॉन्सून जास्त आहे तिथे निवडणूक आयोगाकडे मुदत वाढवून मागू त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात नवीन सरकार आल्यावर आम्ही मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधार आल्या पाहिजे असा निर्णय घेतला आहे. तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीने अधिकाऱ्यांशी संवाद आणि मार्गदर्शन आम्ही करत आहोत. या आधी जिल्हाधिकारी यांच्या सोबत कार्यशाळा झाली आणि आज महापालिकेच्या आयुक्त यांच्यासोबत संवाद आयोजित करण्यात आले आहे. सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूट झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही व्यापा-यांच्या मागे उभे
देशभरात पाकिस्तानची साथ दिली म्हणून बाय कॉट तुर्की हा ट्रेंड चालवलं जात आहे. तुर्की सफरचंद नाकारले म्हणून, पुण्यातील एका व्यापाऱ्याला पाकिस्तान कडून धमकी देखील देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की ज्या व्यापार्यांनी बायकॉट केला आहे, त्यांच मी अभिनंदन करतो. नेशन फर्स्ट ही आमची भूमिका असली पाहिजे. जो देश मानवतेच्या विरोधात आहे आणि त्या देशाला जर कोणी सपोर्ट करत असेल तर त्याला देखील जागा दाखवणे गरजेचे आहे. ज्या व्यापाऱ्यांनी नेशन फर्स्ट ही भूमिका स्वीकारली त्यांचे मी अभिनंदन करतो. पहलगाम येथे झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता. पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तान उध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाईम यांनी जी सॅटॅलाइट इमेज प्रसिद्ध केली आहे, त्यात त्यांनी पाकिस्तानचा सत्य बाहेर काढले आहे. आम्ही व्यापाऱ्यांच्या मागे उभे असल्याचं यावेळी फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान नाशिक येथे लॉरेन्स बिश्नोई पोस्टर ज्याने दाखवले त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगून याबाबत मी गोपीचंद पडळकर यांना स्वतः तक्रार करायला सांगितली असल्याचे त्यांनी सांगितले.