पुण्यात इटलीच्या पाहुण्याला भावला वडापाव ; कोकण महोत्सवात घेतला महाराष्ट्रीय चवीचा आनंद
पु. ल. देशपांडे कलाग्राम येथील फूड मॉलला दिली भेट
पुणे : पुण्यातील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे सुरू असलेल्या कोकण महोत्सवाला परदेशी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवातील फूड मॉलमध्ये नांदेड जिल्ह्यातील पूजा धावड यांनी ‘समर्थ स्टॉल’च्या माध्यमातून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा स्टॉल उभारला आहे. (italian-gianluca-enjoys-maharashtrian-food-konkan-festival-pune)
या स्टॉलला इटलीचे नागरिक जीआन लुका यांनी भेट देऊन दहीवडा, पाणीपुरी आणि वडापाव यांसारख्या पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जीआन लुका हे Brembo या उद्योग क्षेत्रातील कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत असून कामानिमित्त सध्या पुण्यात आले आहेत.

पुण्यात सुरू असलेल्या कोकण महोत्सवात महाराष्ट्राच्या संस्कृती, खाद्यपरंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे विविध स्टॉल्स पाहण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण स्वीकारत त्यांनी पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे भेट दिली आणि महोत्सवाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा अनुभव आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी इटलीतील आई-वडिलांना व्हिडिओ कॉल केला. या माध्यमातून त्यांनी दहीवडा, पाणीपुरी आणि वडापावचा आस्वाद घेत असल्याची माहिती दिली. त्यांच्या आई-वडिलांनीही आनंद व्यक्त करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उद्योजक हेमंतकुमार धावड, साहित्यिक व्यंकटेश चौधरी, रजत धावड, विमल देगावकर, शिवप्रसाद चौधरी, नितीनकुमार पांचाळ, अमृता चौधरी, शशिदीप चौधरी, कल्पना चौधरी, कल्पना चौधरी, सावी धावड, गाथा चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी जीआन लुका यांनी इटलीमधील आपल्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थाच्या आस्वादाची माहिती दिली. आई-वडिलांनी आनंद व्यक्त करून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी जीआन लुका यांना रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
web title : italian gianluca enjoys maharashtrian food konkan festival pune

