...

Pune Traffic Jam। पुण्यातील ३२ रस्त्यांच्या पाहणीतुन धक्कादायक माहिती उघड !

वाहतूक कोंडीवर महापालिका–पोलिस उपाययोजना एका महिन्यात

Pune Traffic Jam पुणे,  शहरातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे म्हणजे पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला होणारे अनधिकृत वाहन पार्किंग असल्याचे महापालिकेच्या पथ विभागाच्या पाहणी अहवालात निष्पन्न झाले आहे. शहरातील ३२ रस्ते आणि २० चौकांची पाहणी करून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. (pune traffic jam encroachment parking report)

 

धक्कादायक ! पुण्यातील रेस्टॉरंट्सवरील छाप्यांमध्ये खासगी व्यक्तींचा समावेश

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार केलेल्या या पाहणीनंतर महापालिका व वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक उपायुक्त हिम्मतराव जाधव, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते. बैठकीत पुढील एका महिन्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Pune Grand Challenge 2026। पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार

 

 

शहरातील वाहतुक काेंडीला पथारी व्यावसायिकांचे व भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण रस्त्याच्या कडेला होणारे वाहनांचे अनधिकृत पार्कींग ही प्रमुख कारणे जबाबदार असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या पथ विभागाने केलेल्या रस्त्याच्या पाहणीत नाेंदवण्यात आले आहे. पथ विभागाच्या अभियंत्यांनी शहरातील ३२ रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून निरीक्षणाचा अहवाल सादर केला आहे. दरम्यान, पुढील एका महिन्यात कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्याचे महापालिका व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

 

सध्या पावसाचे दिवस असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर जागोजागी पावसाचे पाणी साचते. त्यातच शहराच्या दुतर्फा अनधिकृतपणे चारचाकी व दुचाकींची पार्किंग होते. रस्त्याच्या कडेला व पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होईन कोंडी होते.

 

शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवर होणारी अनधिकृत पार्किंग यासंदर्भात ‘लोकमत’ वृत्त मालिकेच्या माध्यमातून सातत्याने प्रकाश टाकत आहे. या वृत्त मालिकेची दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील वाहतुकीसंदर्भात पथ विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी वाहतूक कोंडी व रस्त्याच्या स्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले होते.

 

शिष्यवृत्ती प्रक्रियेत मोठा बदल ; दिव्यांग विद्यार्थ्यांना थेट DBT मार्फत होणार लाभ, परंतु… 

 

त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील ३२ रस्ते व २० चौकांची प्रत्येक्ष पाहणी करून कोंडीची कारणे काय आहेत, याचा अहवाल प्रेझेंटेशन (सादरीकरणाद्वारे) स्वरुपात सादर केला आहे. या अनुषंगाने महापालिका व वाहतुक पोलिस अधिकाऱ्यांची बुधवारी महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त नवल किशाेर राम, अतिरीक्त पाेलिस आयुक्त मनाेज पाटील, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मतराव जाधव, महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित हाेते. यावेळी वाहतुक कोंडी सुटण्यासाठी ज्या काही उपाय योजना करावयाच्या आहेत, त्या पुढील एक महिन्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

‘‘पथ विभागाच्या अभियंत्यानी केलेल्या पाहणीमध्ये वाहतुकीला काही विद्युत पाेल, अतिक्रमण, अनधिकृत रिक्षा स्थानक, झाडे, बेकायदेशीर पार्किंग, भाजी विक्रेते, डि. पी. बाॅक्स, फिटर – पीलर, वाहतुक बेटे, सायकल ट्रॅक, पदपथांची अतिरिक्त रुंदी आदी कारणीभूत असल्याचे आढळले आहे. प्रत्येक रस्त्यांवर स्वतंत्रपणे चर्चा झाली. त्यानुसार पुढील एका महिन्यात उपाय योजना केल्या जाणार आहेत.’’
– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग, प्रमुख, महापालिका.

 

पुण्यातील ३२ रस्त्यांच्या पाहणीतुन धक्कादायक माहिती उघड

 

प्रमुख कारणे

  • रस्त्यांच्या दुतर्फा होणारे अनधिकृत चारचाकी व दुचाकी पार्किंग
  • पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण व भाजी विक्रेत्यांची गर्दी
  • पदपथांची अतिरिक्त रुंदी, विद्युत पोल, डि.पी. बॉक्स, फिटर-पिलर
  • वाहतूक बेटे, अनधिकृत रिक्षा थांबे आणि अडथळा निर्माण करणारी झाडे

काय उपाययोजना?

  • पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून पर्यायी जागा उपलब्ध करून देणार.
  • अनधिकृत पार्किंगवर कारवाई आणि आरक्षित पार्किंग जागा निश्चित करणार.
  • स्वतंत्र सायकल ट्रॅकऐवजी लाल रंग देऊन सायकलस्वारांसाठी मार्ग मोकळा करणार.
  • अनधिकृत रिक्षा थांबे स्थलांतरित करणार.
  • वाहतूक बेटे व अनावश्यक फलक काढून टाकले जाणार.

 

 

Local ad 1