...

पुण्यातील २१ अतिधोकादायक इमारती महापालिका पाडणार

गरजूंसाठी निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था

पुणे – शहरातील पावसाळ्यात कोसळण्याच्या धोक्यात असलेल्या २१ अतिधोकादायक इमारतींवर पुणे महापालिकेकडून तातडीने कारवाई होणार आहे. या इमारतींमध्ये जुने वाडे आणि राहत्या इमारतींचाही समावेश असून, यातील काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रहिवाशांसाठी महापालिका पावसाळा संपेपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. (dangerous buildings pune action 2025)

 

structural audit 2025। पुण्यातील पूल आणि जुन्या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडीट होणार

 

शहरातील मध्यवर्ती भागात अनेक जुन्या वास्तू आहेत, ज्या आता जर्जर अवस्थेत पोहोचल्या आहेत. काही इमारतींमध्ये मालक व भाडेकरूंमध्ये वाद आहेत, तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने देखभाल होत नाही. अशा इमारती कोसळण्याचा धोका लक्षात घेता महापालिका दरवर्षी सर्वेक्षण करून मिळकतींचे वर्गीकरण करते. यामध्ये ‘अतिधोकादायक’ ठरलेल्या इमारती तत्काळ पाडल्या जातात आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जातो.

 

डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु

 

महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील कलम १६० (ब) व (क) अंतर्गत नोटीस बजावून संबंधित इमारती रिकाम्या करण्याचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी मिळकतधारक विरोध करत असल्याने न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहे. मात्र, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २१ इमारतींबाबत तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

 

महापालिकेने गरजू नागरिकांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिथे इमारतींची दुरुस्ती शक्य आहे, तिथे ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याची पडताळणीही केली जात आहे.

Local ad 1