...

 सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा –  मंत्री पंकजा मुंडे

पुणे, ‘‘मी सर्वच राजकीय पक्ष घराण्यांच्या जवळ आहे. ही माझे वडील गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आहे. मात्र आता कोणी एकत्र यावे न यावे याबाबत मी कोणाला सल्ला देण्या एवढे माझे वय नाही. मी सल्ला किंवा सूचना देण्याच्या भूमिकेत नाही. सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा आहे. असे मत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Animal Husbandry Minister Pankaja Munde) यांनी राज्यातील पवार ठाकरे कुटुंब एकत्र येण्याच्या घडामोडीवर व्यक्त केले.  (Transfers through counseling of officials of the Animal Husbandry Department)

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या म्हणून.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

पुण्यात पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्या करण्यास गुरूवारी (ता.१५) सुरुवात झाली, या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांना महापालिका निवडणुकांविषयी विचारले असता त्यांनी, महानगरपालिका निवडणुका येतील तेंव्हा स्वबळावर लढणे किंवा काय त्यावर चर्चा करण्यात येईल, आता तरी आम्ही महायुती म्हणून आहोत, महापालिकेच्या निवडणुकीत ओबीसी वर अन्याय होणार नाही याचे काळजी घेतली जाईल.
      मुख्यमंत्री यांनी दिलेल्या 100 दिवसाचे काम आमच्या विभगाचे पूर्ण झाले आहे. आम्ही जुने मंत्री आहेत त्यामुळे मुख्यमंत्री यांना कमी त्रास देतो असे मुंडे यांनी यावेळी सांगितले. पशुसंवर्धन हा विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडीत विभाग आहे. तसेच हा विभाग उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो. मात्र तरीही हा विभाग जरासा दुर्लक्षित आहे. हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि ग्रामीण भागात उद्योजक निर्माण होण्यासाठी लवकरच योजना आणणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
Local ad 1