ब्रेकिंग न्यजू । दहावी-बारावीची निकाल कधी लागणार ? जाणून घ्या..

मुंबई : सीबीएससी बोर्डाचा निकाल (CBSE Board Result) नुकताच जाहीर झाला असून, आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education)  घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. 10 वीचा निकाल  हा 10 जूनला निकाल लागेल. तर बारावीचा निकाल हे एक मे च्या दरम्यान लागले, असा अंदाज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे. (Breaking news When will the 10th-12th result be announced?)

 

 

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय घ्याल काळजी ; सांगतायेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले

 

बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान पार पडली होती. 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्याचदरम्यान विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम होऊ शकले नाही. त्यामुळे 12 वी च्या निकालाच्या तारखेची धाकधूक विद्यार्थ्यांसह पालकांत धाकधूक वाढली असून, बारावीचा निकाल 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी सुरू झाली आहे. ( Breaking news When will the 10th-12th result be announced?)

 

 

 

त्यामुळे सुमारे आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता आल्या नाहीत. त्यामुळे निकाल उशिरा लागणार का अशी चर्चा होती. मात्र राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्यातच तर दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. (Breaking news When will the 10th-12th result be announced?)

 

Local ad 1