पुणेकरांचा कौल कोणाच्या पारड्यात ; भाजप – काँग्रेसकडून विजयी उत्सवाची तयारी

पुणे : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. निवडणुकाच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी पुणे लोकसभा मतदार संघासाठी 53.54 टक्के मतदान झाले. भाजपचे मुरलीधर मोहोळ (BJP candidate Muralidhar Mohol) आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) यांच्यांत थेट लढत होत झाली. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. भाजपच्या वतीने विजयानंतर पेढे वाटले जाणार असून, त्यासाठी 370 किलो पेढ्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही विजयी उत्सवाची तयारी केली आहे. (Who will be Pune’s MP, Mohol or Dhangekar?)

पुणे लोकसभा मतदार संघाची (Pune Lok Sabha Constituency) मतमोजणी कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोडाऊनमध्ये होणार आहे. पुण्यामध्ये भाजप उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्या थेट लढत झाली.पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, पुणे छावणी, कसबा पेठ आणि शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये सद्य स्थितीत भाजपचे चार आमदार आहेत तर काँग्रेसचा एक आणि अजित पवार गटाचा एक आमदार आहे. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी कसबा पेठेत सर्वाधिक (59.24 टक्के) तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी (50.67 टक्के) मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदार  संघात  वडगावशेरी, शिवाजीनगर,पर्वती, पुणे छावणी,कोथरूड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण  20 लाख 61 हजार 276 मतदार असून यामध्ये 10 लाख 57 हजार 877 पुरूष मतदार, 10 लाख 3 हजार 75 महिला मतदार आणि 324 इतर मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 3 हजार 678 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामध्ये 5 लाख 84 हजार 511 पुरुष तर 5 लाख 19 हजार 78 महिला आणि इतर 89 जणांनी मतदान केले आहे.

एग्जिट पोल मध्ये मोहोळ विजयी होती असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि मोहोळ समर्थकांनी विजयी उत्सवाची तयारी सुरु केली आहे. तर मी पुणेकरांचा उमेदवार असून, मतदारांनी भरभरुन मतदान केले आहे. त्यामुळे मी विजयी होईल, असा विश्वास आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

भाजपा ने दिली 370 किलो पेढे खरेदीची ऑर्डर

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलनुसार देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी विजयोत्सव साजरा करण्यासाठी  ३७० किलो पेढ्यांचे वाटप केले जाणार आहे.

काँग्रेसकडून ही विजय उत्सवाची तयारी
महाविकास आघाडीने पुणे लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. तसेच महागाई, बेरोजगारीयासह अनेक प्रश्न देशात आवासून उभे राहिले आहेत. त्यामुळे दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला घरी पाठविण्याची मतदारांनी मनस्थिती केली होती. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघातून इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी होतील. निकाल लागणार असून, शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांनी उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे, अशी माहिती काँग्रेस उमेदवाराचे प्रचार प्रमुख मोहन जो यांनी दिली.

Local ad 1