डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या ‘Problem of The Rupee’ च्या शंभरी निमित्त लंडन मध्ये होणार परिषद

पुणे. मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे Problem of The Rupee जागतिक आणि शतकोत्तर, परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 11 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. (A conference will be held in London on the occasion of 100 years of ‘Problem of The Rupee’)

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar)यांनी ११ जून 1923 रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिक्समध्ये (London School of Economics) ‘Problem of The Rupee’ : इट्स ओरिजिन इट सोल्युशन’ या विषयावर प्रबंध सादर करून डी. एसी. ची पदवी संपादीत केली. या प्रबंधामुळे भारताच्या रुपयाच्या समस्ये बरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेतील जवळपास 17 विषयांचा उहापोह केला गेला होता. सन 2023 मध्ये या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या शंभर वर्षातील आर्थिक प्रश्नांचा इतिहास वर्तमान आणि भूगोल यावर भाष्य करून पुढील शंभर वर्षाकरिता विचार करण्यासाठी एक छोटेसे पाऊल टाकण्याचे उद्देशाने मराठी अर्थशास्त्र परिषद महाराष्ट्र आणि सायास सहकारी संस्था पुणे यांच्यातर्फे “प्रॉब्लेम्स ऑफ द रुपी” या विषयावर जागतिक आणि शतकोत्तर, परिषदेचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे 11 जून 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजक रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अॅड. विजया खोपडे, डॉ. संध्या नारखेडे, डॉ. मेघना लोखंडे आदी उपस्थित होते.

 

 

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, या परिषदेसाठी भारतातील विविध विद्यापीठाचे प्राध्यापक, विषय तज्ज्ञ, शासन प्रशासनातील उच्च अधिकारी, न्यायव्यवस्थेतील नामवंत न्यायाधीश , वकील आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आस्था बाळगणारे सर्वसामान्य लोक स्वखचनि उपस्थित राहणार आहेत. साधारणतः भारतातून 35 आणि जागतिक पातळीवरील 25 लोकांचा सहभाग या परिषदेत असणार आहे. या परिषदेत भारतातून रवींद्र चव्हाण, डॉ. केशव पवार, डॉ. गजानन पट्टेबहादुर, डॉ. सजोय रॉय तसेच परदेशातील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधील डॅनियल फाईन (Daniel Pyne), डॉ. जिरेमि स्विगेलर (Jeremy Zwiegelaar) आणि डॉ. फ्रान्सिसको मुनोज (Dr. Francisco Munoj) हे विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी 10 थीमची निवड करून भारतातील नामवंत 50 विद्यापीठांना आणि परदेशातील 50 विद्यापीठांना शोधनिबंध लिहून पाठविण्यास सांगितले होते. आजपर्यंत 15 संशोधकांनी विविध विषयावर आपले शोधनिबंध लिहून परिषदेत सादर करणार आहेत. याशिवाय Reserve Bank, NABARD, इतर बँकांचे वरिष्ठ अधिकारी, अर्थतज्ञ, आणि वित्तीय संस्थातील मान्यवर या थीमर्स शोधनिबंध पाठवीत आहेत. तसेच यापैकी काही तज्ञ या परिषदेत ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.

 

या परिषदेचे फलित म्हणून साधारणतः ऑक्टोबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या शोधनिबंधाचे आणि परिषदेमध्ये तज्ञ व्यक्तींनी केलेल्या भाषणाचे संकलन करून पुस्तक रूपाने ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 100 वर्षांपूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रोवण्यासाठी “Problem of The Rupee” च्या निमित्ताने केलेल्या योगदानास श्रद्धा सुमनांची आदरांजली म्हणून आम्ही ही परिषद आयोजित करीत आहोत, असेही चव्हाण यांनी सांगितले.

 

 

Local ad 1