खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया.. काय् म्हणाले ते जाणून घ्या..

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय धक्कादाय आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सजंय राऊत यांनी व्यक्त केली आहे. (Reaction of MP Sanjay Raut.. Know what he said.)

 

 राऊत म्हणाले, ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असे करावे लागेल, असा टोला लगावला. खोक्यांचा कुठंपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठे गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख, शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे. निवडणूक आयोगाने आता लोकांचा विश्वासही गमावला असल्याची टीका राऊत यांनी केली.

 

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाले

 

स्वायत्त संस्था कशा प्रकारे संपवल्या जात आहे, हे दिसून येत आहे. निवडणूक आयोग असेल किंवा मग तपास यंत्रणा असेल हे कोणाच्यातरी गुलाम असल्यासारखे वागत आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. (Reaction of MP Sanjay Raut.. Know what he said.)

 

आम्ही लोकांमध्ये जाणार असून, लोकांमधून पुन्हा एकदा शिवसेना उभी करणार असल्याचा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आणि नवीन निवडणूक चिन्ह लोकांपर्यंत घेऊन जाऊ असेही राऊत यांनी म्हटले.(Reaction of MP Sanjay Raut.. Know what he said.)

Local ad 1