निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का : एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाले

दिल्ली :  महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ करणारी मोठी बातमी येत असून, उद्धव ठाकरे गटाऐवजी एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यामुळे  राज्यातील राजकीय घडामो़ड मानली जात आहे. (Eknath Shinde got Dhanushyaban and Shiv Sena Paksha)

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटी ला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणले होते. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणे अपेक्षित होते. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा झटका मानल जात आहे.

Local ad 1