नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला स्थगिती

मुंबई : राज्यातली पोलीस भरती (Police Recruitment 2022) पुढे ढकलल्याची माहिती समोर आली आहे. यासदंर्भातील एक पत्र सोशलमिडियावर व्हायरल होत असून, त्यात प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती (Police Recruitment 2022) स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील महिन्यामध्ये 14 हजार 956 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. या भरतीची जाहिरात 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Postponement of police recruitment to be held in November)

 

 

पोलीस महासंचालक (Director General of Police) कार्यालयाकडून एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये भरती प्रक्रिया (Police Recruitment 2022) प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस भरतीसंदर्भातील नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Postponement of police recruitment to be held in November)

 

आरक्षण जाहीर 

  • राज्याच्या पोलीस मुख्यालयातून प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर केले होते. रिक्त 14 हजार 956 जागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 हजार 811 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 हजार 350 जगा, विमुक्त जाती (अ) या प्रवर्गासाठी 426 जागा, भटक्या जमाती (ब)साठी 374 जागा, भटक्या जमाती (क) साठी 473 जागा, भटक्या जमाती (ड) साठी 292 जागा, विमुक्त मागास प्रवर्गासाठी 292 जागा, ओबीसींसाठी 2 हजार 926 जागा, ईडब्ल्यूएससाठी 1 हजार 544 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 5 हजार 468 जागा; असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. (Postponement of police recruitment to be held in November)

    कुठे होणार भरती..

  • बृहन्मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, पिंपरी चिचवड, मिरा भाईंदर नागपूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर, सोलापूर शहर  आणि लोहमार्ग मुंबई आयुक्तालय. तसेच ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग रत्नागिरी, नाशिक ग्रामीण, अहमदनगर, धुळे, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर ग्रामीण,भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, लोहमार्ग पुणे, लोहमार्ग औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत भरती केली जाणार आहे. (Postponement of police recruitment to be held in November)
Local ad 1