गोड बातमी : राज्यात पोलीस भरतीला मंजुरी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली घोषणा

राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) आज महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्यातील रिक्त असलेल्या सात हजारांहून अधिक पोलीस शिपाई (Police constable) संवर्गातील भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. (Home Minister Dilip Walse Patil announces approval for police recruitment in the state)

 

 

 

 

महाराष्ट्र पोलीस शिपाई संवर्गातील 7,231 रिक्त पदे भरली जाणार

आधी 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. त्यात उत्तीर्ण होणारे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरतील. (approval for police recruitment in the state)

 

पुरुषांची मैदानी चाचणी अशी होणार

1600 मीटर धावणे  – 20 गुण
160 मीटर धावणे  – 15
गोळाफेक  –  15
एकूण  – 50

 

महिलांची मैदानी चाचणी

800 मीटर धावणे 20 गुण
100 मीटर धावणे – 15
गोळाफेक – 15
एकूण  – 50

 

 

राखीव पोलीस बलातील सशस्त्र शिपाई पदासाठी एकूण 100 गुणांची शारीरिक परीक्षा होणार  (approval for police recruitment in the state)

 

पुरुषांची मैदानी चाचणी अशी होणार

5 किमी धावणे  – 50 गुण
100 मीटर धावणे  – 25
गोळाफेक – 25
एकूण  – 100

 

 

लेखी परीक्षा

शारीरिक चाचणीत 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरतील.

100 गुणांची बहुपर्यायी प्रकारची परीक्षा होणार आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी,  बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण.

 

Local ad 1