पोलीस भरती कधी होणार हे आधी सांगा ; तरुणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी

नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी (Marathwada Muktisangram Din)  ध्वजारोहण करण्यासाठी आलेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तरुणांनी पोलीस भरती कधी होणार असा जाब विचारत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांनी तरुणांवर सौम्य लाठीमार केला. (Tell me first when the police recruitment will be) 

 

 

 

 

शहरातील माता गुजरिजी विसावा उद्यान या ठिकाणी मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर फडणवीस श्रीनगर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला हजारो तरुण थांबले होते. फडणवीस पोहचताच तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

 

 

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तरुणांचे निवेदन स्वीकारले, यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, विद्यार्थी आक्रमक झाले. यावेळी धक्काबुक्की ही सुरू झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत गर्दीला पांगविले आहे.

 

Local ad 1