मराठवाड्यातील शेतकर्‍यांना मदतीसाठी हवेत अडीच हजार कोटी  

नांदेड : जून ते ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 12 लाख 49 हजार 731 हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे नुसनाक झाले आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने बळीराजा पूर्णतः कोलमडून गेला आहे. शेतकर्‍यांना  (farmers of Marathwada) आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

 

 

सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यात मराठवाड्यातील 28 लाख 76 हजार 816 शेतकर्‍यांच्या 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.यासाठी 2 हजार 479 कोटींची मदत अपेक्षित आहे. (2.5 thousand crores in the air to help the farmers of Marathwada)

 

मराठवाड्यात 727 मिमी पाऊस अपेक्षित असताना, यंदा 911 मिमी पाऊस झाला. म्हणजेच अपेक्षित सरासरीच्या 125 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, मका, फळपिकांना बसला आहे. यंदा सोयाबीनचे पेरणी अधिक झाली होती. पण सोयाबीन काढणीला आले असतानाच परतीच्या पावसाने झोडून काढले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचा  (farmers of Marathwada)  मोठा फटका बसला आहे.  (2.5 thousand crores in the air to help the farmers of Marathwada)

  • औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख 79 हजार 56 शेतकर्‍यांचे 4 लाख 43 हजार 943 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. बीड जिल्ह्यात 7 लाख 87 हजार 799 शेतकर्‍यांचे 4 लाख 78 हजार 327 हेक्टर शेतीचे नुकसान झाले.जालना जिल्ह्यात 5 लाख 67 हजार 826 शेतकर्‍यांचे 3 लाख 88 हजार 922 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 407 शेतकर्‍यांचे 2 लाख 19 हजार 105 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात 54 हजार 876 शेतकर्‍यांचे 12 हजार 360 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. नांदेडच्या 49 हजार 885 शेतकर्‍यांचे 21 हजार 500 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. लातूर जिल्ह्यात 16 हजार 948 शेतकर्‍यांचे 14 हजार 942 हेक्टर शेतीचे नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यात 2 लाख 59 हजार 19 शेतकर्‍यांचे 1 लाख 91 हजार 579 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे.

अपेक्षित मदत

  • औरंगाबाद 628 कोटी 20 लाख
    जालना  575 कोटी 47 लाख
    परभणी 279 कोटी 98 लाख
    हिंगोल 16 कोटी 81 लाख
    नांदेड 29 कोटी 24 लाख
  • बीड650 कोटी 53 लाख
    लातूर 20 कोटी 44 लाख
    उस्मानाबाद 20 कोटी 44 लाख
Local ad 1