...

पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली  

पुणे महापालिकेत तब्बल 38 लाख चौरस फुट टीडीआर वाटप 

पुणे, १८ जून २०२५ : पुणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले सेवानिवृत्त होण्याच्या शेवटच्या दोन महिन्यात विविध कारनामे केले असून, या सुरस कथा समोर येत आहेत. पुणे महापालिकेने एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये तब्बल ३८ लाख चौरस फुट टीडीआर (Transferable Development Rights) मंजूर केले असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर टीडीआरची खैरात वाटण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने माहिती मागवली आहे, अशी माहिती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी दिली. (pmc tdr scam urban development inquiry 2025)

 

पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन

 

 

महापालिकेच्या नियमानुसार, आरक्षणाच्या जागा, एसआरए प्रकल्प किंवा रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेतल्यास मोबदल्यात टीडीआर दिला जातो. हा टीडीआर जागा मालक बांधकाम व्यावसायिकांना विकतो आणि त्याचा वापर अतिरिक्त एफएसआयसाठी केला जातो. (pmc tdr scam urban development inquiry 2025)

 

📊 कोणत्या काळात किती टीडीआर वाटप?

  • एप्रिल २०२५: २१ लाख चौरस फुट
  • मे २०२५: १८ लाख चौरस फुट
    → एकूण: ३८ लाख चौरस फुट टीडीआर

 

 

सेवानिवृत्त आयुक्त  राजेंद्र भोसले यांच्या कार्यकाळात ही प्रकरणे मंजूर झाली. काही प्रकरणांमध्ये जमीन मालकांनी टीडीआर ऐवजी थेट एफएसआय मागितल्याने डीआरसी रद्द करण्याची मागणी केली आहे. यापैकी काही प्रस्तावांची किंमत १५० ते २०० कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे.

 

बिग ब्रेकिंग ; जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार, पाच गंभीर जखमी

 

🔍 नगरविकास विभागाची चौकशी सुरू

या प्रकरणात कायद्याचा योग्य आढावा न घेताच टीडीआर मंजूर केल्याचा आरोप असून, नगरविकास विभागाने १०७ ते ११० विषयपत्रांवरील टीडीआर वाटपाची माहिती मागवली आहे. त्यामुळे लवकरच या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

Local ad 1