नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !
नांदेडकरांच्या मागणीला यश
नांदेड : नांदेडकरांच्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. जलना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार हजूर साहिब नांदेडपर्यंत करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने १२ जून २०२५ रोजी यास अधिकृत मंजुरी दिली असून लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. (nanded mumbai vande bharat express starts 2025)
एअर इंडिया विमान अपघात : 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकमेव प्रवासी बचावला
या निर्णयामुळे नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक, ठाणे आणि दादर या प्रमुख स्थानकांवरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद, आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाची सोय होणार आहे. (nanded mumbai vande bharat express starts 2025)
विस्तारित वेळापत्रक
20705 हजूर साहिब नांदेड – CSMT वंदे भारत एक्सप्रेस
स्थानक | आगमन | प्रस्थान |
---|---|---|
हजूर साहिब नांदेड | — | 5:00 |
परभणी | 5:40 | 5:42 |
जालना | 7:20 | 7:22 |
औरंगाबाद | 8:13 | 8:15 |
अंकाई | 9:04 | — |
मनमाड | 9:58 | 10:03 |
नाशिक रोड | 10:56 | 11:00 |
कल्याण | 13:06 | 13:10 |
ठाणे | 13:40 | 13:42 |
दादर | 14:08 | 14:10 |
CSMT | — | 14:25 |
20706 CSMT – हजूर साहिब नांदेड वंदे भारत एक्सप्रेस
स्थानक | प्रस्थान | आगमन |
---|---|---|
CSMT | 13:10 | — |
हजूर साहिब नांदेड | — | 22:50 |
सेवेची वैशिष्ट्ये:
-
आठवड्यातील ६ दिवस सेवा सुरु (नांदेड व गुरुवारी CSMT सुट्टी).
-
परभणी येथे व्यावसायिक थांबा.
-
हजूर साहिब नांदेड येथे प्राथमिक देखभाल सुविधा.
-
सोलापूर-CSMT वंदे भारत रेकसोबत लिंकिंग.
-
उद्घाटनावेळी विशेष गाडी चालवण्याचा विचार.
रेल्वे बोर्डाने संबंधित विभागांना लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई आणि मराठवाडा यांच्यातील हा प्रवास आता आणखी जलद आणि सोयीचा ठरणार आहे.