नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी ; अनेक गावांत पाणी शिरले, संपर्क ही तुटला

नांदेड : राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी होत असून, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी, दुसरीकडे मात्र, काही ठिकाणी या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असून, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून, आसना नदीला पूर आला आहे. त्यामुळे काही गांवाचा संपर्क तुटला आहे. (In Nanded, Hingoli district, heavy rains flooded many villages and communication was cut off)

 

 

 

नांदेड जिल्ह्यात काल सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पावसामुळे हजारो हेक्टरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरले असून, गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. (In Nanded, Hingoli district, heavy rains flooded many villages and communication was cut off)
 

दरम्यान, आसना नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असून, वसमत नांदेड राज्य महामार्गावरील आसना नदी पूल पाण्याखाली जाऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन, केळी, ऊस, उडीद, मूग, कापूस, हळद ही  शेतकऱ्याची पीके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. (In Nanded, Hingoli district, heavy rains flooded many villages and communication was cut off)

 

जोशी सांगवी येथे ढगफुटी होऊन शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील पिके पाण्यात वाहुन गेले आहेत.

 

पुराच्या पाण्यामुळं पिकांसह शेतीही खरडून गेली आहे. तर नांदेड शहरातील कौठा, सिडको, मुदखेड, मुखेड अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात घरात पाणी शिरले आहे. तर तालुक्यातील शेलगाव खु, शेलगाव बु, शेणी, कोंढा, देळूब खु, देळूब बु यासह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. (In Nanded, Hingoli district, heavy rains flooded many villages and communication was cut off)

 

 

हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात शिरलं पाणी

हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासूनच जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा, आसेगाव गावांच्या शिवारात जोरदार पाऊस झाला आहे. (In Nanded, Hingoli district, heavy rains flooded many villages and communication was cut off)

 

 

मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गावांमध्ये पाणी शिरले आहे. हे पाणी संपूर्ण गावातील घरात शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक घरातील छतावर जाऊन बसले. ज्या गावातील पाणी ओसरत आहे तिथे प्रशासन मदत करत आहे.

 

 

 

आसेगाव मार्गे नांदेडकडे जाणारा रस्ता पूर्णपणं बंद झाला आहे. पाण्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर प्रशासनाच्यावतिने आढावा घेतला जात आहे. पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

 

Local ad 1