मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद, शिक्षण हक्कचे निदर्शने

पुणे : मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती बंद करणे ही अल्पसंख्याक समाजाला मागे घेऊन जाण्याचा निर्णय आहे. त्या पुन्हा पुर्ववत सुरु करावे या मागणीसाठी शिक्षण मंच हक्कचे अध्यक्ष मतीन मुजावर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. (Maulana Azad National Fellowship, Pre Matric Scholarship Closed)

 

 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना (minority students) यापुढे मौलाना आझाद शिष्यवृत्ती मिळणार नाही. केंद्र सरकारने ही शिष्यवृत्ती बंद केल्याची माहिती अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली. केंद्र सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी चालवली जाणारी मौलाना आझाद शिष्यवृत्ती बंद केली आहे. ही शिष्यवृत्ती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी (संशोधन) देण्यात आली होती. (Maulana Azad National Fellowship, Pre Matric Scholarship Closed)

 

 

अल्पसंख्याक कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत काँग्रेस सदस्य टीएन प्रतापन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शिष्यवृत्ती बंद करण्याबाबत माहिती दिली. यापूर्वी केंद्र सरकारने अल्पसंख्याकांना मॅट्रिकपूर्व स्तरावर दिली जाणारी शिष्यवृत्तीही बंद केली होती. (Maulana Azad National Fellowship, Pre Matric Scholarship Closed)

 

लोकसभेत काँग्रेस सदस्य टीएन प्रतापन यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या, योजना सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या उच्च शिक्षणासाठी इतर फेलोशिप योजनांशी ओव्हरलॅप आहे. अशा परिस्थितीत अल्पसंख्याक विद्यार्थी अशा योजनांचा लाभ घेत आहेत, त्यामुळे सरकारने २०२२-२३ पासून एमएएनएफ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Maulana Azad National Fellowship, Pre Matric Scholarship Closed)

देशातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फटका..

एमफील आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप दिली जात होती. मात्र, केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना संशोधनाच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.

Local ad 1