शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरण्यासाठी २० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)  (Pre Higher Primary Scholarship Examination) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pre-Secondary Scholarship Examination) (इयत्ता ८ वी) या परीक्षेकरीता शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता २० डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of deadline till 20th December for submission of application form for scholarship examination)

या परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची १५ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत शाळांनी ऑनलाईन शाळेची माहिती व आवेदनपत्र भरलेले नसल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension of deadline till 20th December for submission of application form for scholarship examination)

शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र व नियमित शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत २० डिसेंबर, विलंब शुल्क २१ ते २५ डिसेंबर, अतिविलंब शुल्क भरण्याची मुदत २६  ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. शाळांनी आपली माहिती व आवेदनपत्र विहीत मुदतीत भरण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी केले आहे. (Extension of deadline till 20th December for submission of application form for scholarship examination)

Local ad 1