Heavy rain in Pune | पुण्यात पावसाचा थैमान ; अनेक घरात पाणी शिरले

Heavy rain in Pune | पुणे : रविवारी सायंकाळी पुणे शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला.यामुळे अनेक भागात घरामांध्ये पाणी शिरले असून, काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी व इतर कामानिमित्त बाहेर पडलेल्या पुणेकरांची तारांबळ उडाली. (Heavy rain in Pune; Water entered many houses)

 

 

रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. त्यामुळे 22 कुटुंबियांचा जीव धोक्यात आला आहे, बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या चुकीच्या कामामुळे येथील 11 ते 12 घरांत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी शिरले आहे, त्यामुळे नागरिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सदर प्रकरणाची चौकशीची मागणी करणार आहे. (Heavy rain in Pune; Water entered many houses)

 

 

पाषाण पंचवटी येथे मोठे झाड पडलेले असून 2 वाहने झाडाखाली अडकलेले आहेत. त्यातील एक वाहन सुरक्षित आहे एक तीन चाकी मालवाहू टेम्पो पूर्णपणे झाडाखाली अडकलेला आहे. तसेच रस्त्याच्या पलिकडे सदरचे झाड पुढे असणाऱ्या दुकानांच्या सेटवर पडलेले आहे. अग्निशमन दलाकडून काम चालू असून कोणीही जखमी झालेले नाही. (Heavy rain in Pune; Water entered many houses)

 

 

अग्निशमन विभागाने दिलेली माहिती

पाणी साचले 👇

1) चंदननगर पोलिस स्टेशन
2) वेदभवन, कोथरुड
3) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड
4) लमाण तांडा, पाषाण
5) सोमेश्वर वाडी, पाषाण
6) वानवडी, शितल पेट्रोल पंप
7) बी टी ईवडे रोड
8) काञज उद्यान

 

 

झाडपडी 👇

1) एनसीएल जवळ पाषाण
2) साळुंखे विहार, कोंढवा
3) ज्योती हॉटेल जवळ कोंढवा
4) चव्हाणनगर
5) रुबी हॉल जवळ, पुणे स्टेशन

 

स्वारगेट बस स्थानकात प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने तसेच वाहतूक कोंडीने प्रवाशांची तारांबळ

Local ad 1