शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; अन्यथा होणार शिस्तभंगाची कारवाई
मुंबई : शासकीय कार्यालमध्ये अनेकजण कामानिमित्त येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी कोण हे ओळखू येत नाही. त्यामुळे विशेष करुन ते शासकीय कार्यालयांचे ओळखपत्र वापरत नाहीत. त्यामुळे मोठी अडचण होते. अशा ओळखपत्र न लावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. कारण राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने ७ मे २०१४ रोजी प्रथम परिपत्रक काढले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर २०२३ रोजी या सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला. तरीदेखील काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात येताना व कामकाजादरम्यान ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत, अशी तक्रार शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना व कार्यालयीन वेळेत आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर असेल. शासनाच्या या निर्णयामुळे कार्यालयीन शिस्त व पारदर्शकता वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनिक वर्तुळात सांगितले जात आहे.
काय आहे शासन परिपत्रक
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.१०.१०.२०२३ द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला.