कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर जाणार उद्धव ठाकरेंच्या भेटीला

पुणे ः भारतीय जनता पक्षाने कसबा पेठ पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेची केली होती. गेल्या तीस वर्षांपासूुन कसबा हा भाजपच्या ताब्यात होता. परंतु महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केलेल्या एकत्र प्रचारामुळे भाजपला पराभव पहावा लागला आहे. (MLA Ravindra Dhangekar will go to meet Uddhav Thackeray)

 

 

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा सुमारे अकरा हजार मतांनी पराभव केला. धंगेकर यांच्या वियजात शिवसेना (ठाकरे) कार्यकर्त्यांचाही मोठा वाटा आहे. धंगेकर यांना विजयी करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना अवाहन केले होते.

 

राज्यात अवकाळी पाऊस, मुख्यमंत्र्यांनी दिला मत्वाचा आदेश

धंगेकरांच्या विजयसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी धंगेकर यांच्या प्रचारासाठी रॅली काढली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. (MLA Ravindra Dhangekar will go to meet Uddhav Thackeray)

 

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर बुधवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. (MLA Ravindra Dhangekar will go to meet Uddhav Thackeray)

Local ad 1