विधानसभेत महिला धोरणावर महिला आमदार आज करणार चर्चा

Maharashtra Budget Session : जागतिक महिला दिन (International Women’s Day) साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर (women’s policy) चर्चा केली जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील महिला सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडणार आहेत. (Women MLAs will discuss women’s policy in the assembly today)

 

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. मात्र त्याला विधिमंडळाची मंजुरी मिळण्याच्या आधीच सरकार कोसळले. मात्र, सध्या विधानसभेच्या अर्थसंकल्पात त्यावर चर्चा केली जाणार आहे. बुधवारच्या विधानसभा (Assembly) कामकाजातीत आजच्या एकूण आठ लक्षवेधी सूचना असून, त्यातील सात लक्षवेधी मांडण्याची संधी महिला आमदारांना दिली जाणार आहे.  (Women MLAs will discuss women’s policy in the assembly today)

 

लक्षवेधी मांडणाऱ्या आमदार

आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), देवयानी फरांदे (Devayani Farande), भारती लव्हेकर (Bharati Lavekar), मंदा म्हात्रे (Manda Mhatre), श्वेता महाले (Shweta Mahale), यामिनी जाधव (Yamini Jadhav), जयश्री जाधव (Jayashree Jadhav), सरोज अहिरे (Saroj Ahire) यांचा समावेश आहे.

 

women’s policy महिला धोरणाची वैशिष्ट्य काय? 

स्त्री-पुरुष जन्मदर समान ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करणे, महिलांचा सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन रूजवणे आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलणे, सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी आणि त्यांना उद्दिष्ट साध्य करता येईल या साठी पोषक वातावरण तयार करणे, धर्म, जात, सत्ता, प्रदेश यांमुळे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरुद्ध स्त्रियांना पाठबळ देणे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे, शासन स्तरावरील निर्णयप्रक्रियेत महिलांच्या हिताचे व हक्कांची जपणूक आणि संवर्धन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणारी आधुनिक आणि स्वबळावर उभी असणारी नवी प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे, अशी महिला धोरणांची वैशिष्ट्य आहे.

Local ad 1