रवींद्र धंगेकर सोशल मीडिया, गुगलवर ट्रेंडिंगमध्ये

पुणे : व्हु इंज धंगेकर.. या  पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांच्या वक्त्यावर कळलं का, ‘आता कळलं का व्हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) फक्त घाम नाही, तर बालेकिल्ला फोडला’असे सोशल मीडियावर (Social media) उत्तर देण्यात आले आहे. तर दुसरीकडे कसबा पेठ पोटनिवडणुकीचा निकाल आणि रवींद्र धंगेकर सोशल मीडिया आणि गुगल ट्रेंडिंगमध्ये होते. (Ravindra Dhangekar Trending on Social Media, Google)

 

 

केंद्रांत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि कसब्यात रविंद्र.., ‘धंगेकरां’चा दंग्यामुळे भाजपची रणनीती ‘रास’ नाही आली.., आता कळंल का धंगेकर कोण?..अशा अनेक ‘पोस्ट’ने  कसब्याची विधानसभा निवडणूक आणि रविंद्र धंगेकर ट्रेंडिंगमध्ये होते.तसेच दूपारी तीन वाजेपर्यंत रविंद्र धंगेकर ट्वीटरवर देशात टॉप ३० मध्ये ट्रेंडींगला होते.

 

 

कसब्याचा निवडणूक निकालाकडे राजकारणासह नेटकऱ्यांचे लक्ष होते. निकालाचा कल जसे-जसे समोर येत होते. तसे व्हिडीओ मिम्स आणि ‘सल्ला’ देणारे पुणेरी टोमणे सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले. (Ravindra Dhangekar Trending on Social Media, Google)

 

भाजप नेते चंद्रकांच पाटील यांचा ‘व्हू इज धंगेकर’ असा प्रश्न एक जाहीर सभेत विचारला होता. त्या प्रश्नाला नेटकऱ्यांनी जोरदार उत्तर दिले आहे. ‘आता कळलं का व्हू इज धंगेकर? फक्त घाम नाही, तर बालेकिल्ला फोडला’ अशा शब्दात उत्तर देण्यात आले. (Ravindra Dhangekar Trending on Social Media, Google)
Local ad 1