सोशल मिडियावर अफवा, जातीय द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

पुणे : पेरणे फाटा (Koregaon Bhima) येथे १ जानेवारी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे शहर पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Pune City Police Joint Commissioner Sandeep Karnik) यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (Section 144 of the Code of Criminal Procedure 1973)  प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. (Strict action will be taken against those who spread rumors and communal hatred on social media)

 

 

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. (Strict action will be taken against those who spread rumors and communal hatred on social media)

पुणे शहर आयुक्तालय मधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या लेखी परवानगी शिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे  आदेशात नमूद केले आहे. (Strict action will be taken against those who spread rumors and communal hatred on social media)

Local ad 1