Bakrid eid 2023 | बकरी ईदच्या सार्वजनिक सुट्टीत बदल

 पुणे : शासकीय सुट्टी कॅलेंडरमध्ये बकरी ईद (ईद उल झुआ) निमित्त सार्वाजनिक सुट्टी ही 28 जून रोजी आहे. मात्र, बकरी ईद ही गुरुवारी असल्याने 28 जून ची सुट्टी रद्द करुन ती 29 जून रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सो.ना.बागुल यांनी जारी केले आहेत. (changes to the public holiday of bakrid eid 2023)

शासनाने 2023 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्टयांमध्ये बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी बुधावारी (28 जून) दर्शविण्यात आली आहे.  मात्र, ईद ही 29 जून रोजी येत आहे. त्यामुळे 28 जूनची सार्वजनिक सुट्टी आता 29 जून रोजी करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.   (changes to the public holiday of bakrid eid 2023)
Local ad 1