आषाढी वारी २०२५ : पालखी तळावरील बारा ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीने खास मंडप उभारणी
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची माहिती
Ashadhi Vari 2025 । पुणे : आषाढी वारी २०२५ निमित्त श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून अनुक्रमे ७ व १३ दिवस पायी प्रवास करणार आहे. या दरम्यान पालखी सोहळ्याचा बारा दिवस पुणे जिल्ह्यामध्ये मुक्काम राहणार आहे. यावर्षी पाऊस जास्त असल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने पालखीतराव तळावर म्हणजेच मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीने खास पालखीसाठी मंडप उभारण्याचा निर्णय घेतला आहे. (ashadhi vari 2025 palakhi jerman hangar sauchalay)
महानगरपालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभाग अनिवार्य – शासनाचा मोठा निर्णय
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान हे १८ जून रोजी देऊळतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान १९ जून रोजी आळंदीतून होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पालखी सोहळ्याच्या प्रवासादरम्यान पुणे जिल्हा परिषदेकडून पालखी सोहळ्याकरिता आरोग्य सुविधा, पिण्याचे पाणी, तात्पुरते शौचालय, निवास व्यवस्था आदी सुविधा देण्यात येणार आहे. (Ashadhi Vari 2025) यंदाच्या आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा १२ दिवस मुक्काम पुणे जिल्ह्यात होणार असून, त्या ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीने भव्य मंडप उभारण्यात येणार आहेत. पावसामुळे वारकऱ्यांना अडचण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ही व्यवस्था केली जात आहे.
यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग जाताना १ हजार ८०० तात्पुरती शौचालय तर, येताना ३०० तात्पुरती शौचालय उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग जाताना १ हजार २०० व येताना २०० तात्पुरती शौचालय उभारले जाणार आहेत. श्री संत सोपान काका महाराज पालखी मार्ग जाताना ३०० शौचालय उभारण्यात येणार आहे तर, इतर पालखी मार्गावर २५० असे मिळून सर्व पालखी मार्गांवर एकूण ४ हजार ५० तात्पुरती शौचालय पुरविण्यात येणार आहेत. याचबरोबर पालखी मार्गावरील हॉटेल वैयक्तिक शौचालय सुलभ शौचालय समाज मंदिर सौचालय मंगल कार्यालय यांमधील सुमारे २१ हजार ४३८ शौचालय वारकरी व भाविकांना वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर साफसफाई करण्यासाठी २५० कामगार पुरविण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत पालखी गेल्यानंतर साफसफाई करण्यात येणार आहे.
2025 विधानसभा : ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे महायुतीला बहुमत – अजित पवार
पालखी मार्गावर ग्रामपंचायत मार्फत निवारा कक्षाची उभारणी करण्यात येणार असून, यामध्ये पिण्याच्या पाणी आरोग्यसेवा, विश्रांतीगृह उपलब्ध असणार आहेत. आरोग्य विभाग मार्फत वारकऱ्यांसाठी खास मसाज सेंटर स्वयंसेवी संस्था व वैद्यकीय कॉलेज यांच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. यावर्षी पाऊस अधिक असल्याने वारकऱ्यांसाठी शासकीय इमारती, शाळा, मंगल कार्यालय, हॉटेल्स अशा ठिकाणी निवासाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष ५८ ठिकाणी पालखी मार्गावर उभारण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य सुविधा, सॅनिटरी पॅड, बालकांसाठी कृष्ण कोपरा, मुलांसाठी खेळणी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांना व भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मार्गावर तात्पुरते उपचार केंद्र , मोटार बाईक वरील आरोग्य दूत, अत्यावश्यक संदर्भ सेवेसाठी रुग्णवाहिका, मुक्कामाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रात तात्पुरत्या आयसीयु सुविधा व खाजगी रुग्णालयांमध्ये दहा टक्के काठा राखीव ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर पालख्यांमधील सर्व दिंडी प्रमुखांना ३ हजार औषध किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये तेरा प्रकारच्या औषधांचा समावेश करण्यात आला आहे. १३३ वैद्यकीय अधिकारी, ४७६ आरोग्य कर्मचारी हे पालखी मार्गावर कार्यरत राहणार आहेत. तर १०२ क्रमांकाच्या ११८ रुग्णवाहिका व ५३ रुग्णवाहिका १०८ क्रमांकाच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. वारकऱ्यांसाठी वारी मार्गावर पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी ९८ टँकर भरणा ठिकाणाचे नियोजन करण्यात आले असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
मोबाईल शौचालयांची व्यवस्था
वारी मार्गावर एकूण ४,०५० तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग : 1,800 (जाताना) + 300 (परतताना)
संत तुकाराम महाराज मार्ग : 1,200 (जाताना) + 200 (परतताना)
संत सोपानकाका महाराज मार्ग : 300
इतर मार्ग : 250 त्याचबरोबर २१,४३८ सार्वजनिक/खाजगी शौचालये भाविकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
महिलांसाठी ५८ ‘हिरकणी कक्ष’
पालखी मार्गावरील ५८ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारले जात असून, त्यामध्ये:
सॅनिटरी पॅड्स
बालकांसाठी कृष्ण कोपरा
मुलांसाठी खेळणी
विश्रांती व आरोग्य सुविधा
उपलब्ध असणार आहेत.
आरोग्य सेवा मजबूत
१३३ वैद्यकीय अधिकारी, ४७६ आरोग्य कर्मचारी कार्यरत
३,००० औषध किट्स वाटप
१०२ व १०८ क्रमांकाच्या १७१ रुग्णवाहिका सज्ज
प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये तात्पुरती ICU व्यवस्था
बाईकवर फिरणारे आरोग्यदूत, तात्पुरती उपचार केंद्रे
पाणी आणि निवास
२०० टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा, ९८ टँकर भरथी ठिकाणांची योजना
शासकीय इमारती, शाळा, हॉटेल्स, मंगल कार्यालयांमध्ये निवासाची सोय
ग्रामपंचायतीमार्फत निवारा कक्ष उभारले जाणार
स्वच्छतेसाठी विशेष भर
वारीनंतर स्वच्छतेसाठी २५० सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, ते पालखी मागोमाग साफसफाई करतील. (Ashadhi Vari 2025)