...

इराणमधील तणावामुळे Air India चे अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट डायव्हर्ट

इराणमधील तणावामुळे एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे मार्ग बदलले

दिल्ली : इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे आणि त्या अनुषंगाने हवाई हद्द (Airspace) बंद केल्यामुळे  (इराण हवाई हद्द बंद) एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवा तात्पुरत्या बदलण्यात आल्या आहेत. ( Air India Flights Diverted) प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून ही तातडीची कार्यवाही करण्यात आली आहे. (air india flights diverted iran airspace 2025)

 

एअर इंडिया विमान अपघात : 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकमेव प्रवासी बचावला

 

 

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बदललेले मार्ग खालील प्रमाणे आहेत

  • AI130 – लंडन हीथ्रो-मुंबई – वियेनाकडे वळवले
  • AI102 – न्यूयॉर्क-दिल्ली – शारजाहकडे वळवले
  • AI116 – न्यूयॉर्क-मुंबई – जेद्दाकडे वळवले
  • AI2018 – लंडन हीथ्रो-दिल्ली – मुंबईकडे वळवले
  • AI129 – मुंबई-लंडन हीथ्रो – मुंबईत परत
  • AI119 – मुंबई-न्यूयॉर्क – मुंबईत परत
  • AI103 – दिल्ली-वॉशिंग्टन – दिल्लीत परत
  • AI106 – न्यूयॉर्क-दिल्ली – दिल्लीत परत
  • AI188 – व्हँकुव्हर-दिल्ली – जेद्दाकडे वळवले
  • AI101 – दिल्ली-न्यूयॉर्क – फ्रँकफर्ट/मिलानकडे वळवले
  • AI126 – शिकागो-दिल्ली – जेद्दाकडे वळवले
  • AI132 – लंडन हीथ्रो-बेंगळुरू – शारजाहकडे वळवले
  • AI2016 – लंडन हीथ्रो-दिल्ली – वियेनाकडे वळवले
  • AI104 – वॉशिंग्टन-दिल्ली – वियेनाकडे वळवले
  • AI190 – टोरांटो-दिल्ली – फ्रँकफर्टकडे वळवले
  • AI189 – दिल्ली-टोरांटो – दिल्लीत परत

 

महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !

 

 

या अचानक झालेल्या बदलांमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणींबद्दल एअर इंडियाने दिलगीर व्यक्त केली आहे. (Flight Updates June 2025) यासंदर्भात एअर इंडिया प्रवाशांना पर्यायी प्रवास व्यवस्था, रिफंड किंवा विनामूल्य रीस्केड्युलिंगची सुविधा उपलब्ध करून देत आहे. तसेच निवास व अन्य सोयींचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. (एअर इंडिया विमान मार्ग बदल)

 

प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची अद्ययावत माहिती airindia.com वर तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

 

Local ad 1