Dr. Anil Ramod suspended ।अखेर विभागीय अपर आयुक्त डाॅ. अनिल रामोड निलंबित

आठ लाखांची घेताना सीबीआयने केली अटक

Dr. Anil Ramod suspended । मुंबई : आठ लाखांची लाच घेचाना पुणे विभागाचे अपर आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांना सीबीआयने अटक केली (Arrested by CBI) होती. त सध्या न्यायालयीन कोठडीत असून, राज्य शासनाचे अखेर त्यांचे निलंबन केले आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिवांनी निलंबनाचा आदेश जारी केला आहे. (Finally, Divisional Additional Commissioner Dr. Anil Ramod suspended)

 

 

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (Criminal Investigation Department (India)) मागणीनुसार, विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या निलंबनाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. राज्य सरकारने डॉ. रामोड यांना ४८ तासापेक्षा अधिक काळ पोलिस कोठडीत राहिल्याचे कारण सांगत त्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. (Dr. Anil Ramod suspended ।अखेर विभागीय अपर आयुक्त डाॅ. अनिल रामोड निलंबित)

 

 

सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाच्या बदल्यात जादा रकमेचा मोबादला मिळवून देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याने विभागीय आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना सीबीआयने १० जूनला अटक केली. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. रामोड हे पोलिस कोठडीतनंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या दरम्यान, डॉ. रामोड यांनी वकिलामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

विभागीय आयुक्तालयाने सादर केला होता निलंबनाचा प्रस्ताव

विभागीय आयुक्तालयातील विविध कागदपत्रे जप्त करताना अन्य कागदपत्रांमध्ये तसेच पुराव्यांमध्ये डॉ. रामोड हे छेडछाड करतील. त्याबाबतचे पुरावे बदलण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर, विभागीय आयुक्तालयात पुन्हा ते रुजू झाल्यास या खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करून त्यांना निलंबित करण्याची मागणी सीबीआयने विभागीय आय़ुक्तांकडे केली होती. सीबीआयच्या मागणीचा आधार घेत विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठविला होता.

काय आहे निलंबन आदेशात

डॉ. रामोड यांनी निलंबनानंतरही पुणे हे मुख्यालय सोडून जाऊ नये. तसेच कोणतीही खासगी नोकरी अथवा अन्य व्यवसाय करू नये. तसेच पुण्याबाहेर जाण्यापूर्वी विभागीय आयुक्तांची परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नये, असेही त्यात म्हटले आहे. रामोड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. रामोड यांच्यामागे आता अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Local ad 1