पुणे : पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ.रामोड यांच्या कुटुबीयांकडे मिळालेल्या संपत्ती आणि रोख रक्कम यामुळे आता ईडीची इंट्री होणार असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होत आहे. इडीची इंट्री झाल्यास डॉ. रामोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Dr. Anil Ramod’s problems will increase; entry of ‘ED’?)
सोलापूर जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपाद प्रकरणात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याने डॉ. रामोड यांनी सीबीआयने अटक केली. त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्याशिवाय त्यांच्याकडून मालमत्तांची कागदपत्रे तसेच त्यांच्या कुटंबीयांच्या नावावर ४७ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती सीबीआयला चौकशीत मिळाली. सीबीआयच्या शिफारशीनुसार, विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. त्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. (Dr. Anil Ramod’s problems will increase; entry of ‘ED’?)
रामोड यांच्याकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्याची प्रकरणे येत होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून डॉ. रामोड अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडून महसुली प्रकरणांबाबत अनेक निर्णय झाले आहेत. महसुली प्रकरणांच्या सुनावण्या होत असल्याने अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत. त्यात आठ लाखांची लाच घेतल्याने सीबीआय पाठोपाठ आता ईडीपर्यंत रामोड यांच्या कारनाम्याची माहिती पोहोचली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआय पाठोपाठ रामोड यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वक्फची जमीन इतरांच्या नावावर करून देण्याचे प्रकरणही चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे रामोड यांचे पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.