बिग ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्री पदासह आमदारकीचा ही उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्य पदाचा  राजीनामा देण्याची घोषणा केले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी कोसळले आहे. (Uddhav Thackeray resigns as Chief Minister)

 

 

 

सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले आहे., शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केल्याचे समाधान आहे.

 

 

एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचे आहेत. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतोय. साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले… या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं. आमदार, खासदार, मंत्री बनवले. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिले ते नाराज झाले, पण ज्यांना काहीच दिले नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत.

 

 

 

उद्या केंद्रीय राखीव दल मुंबईत येणार आहे, लष्करही येईल. उद्या कोणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नका, सर्वांना येऊ द्या. लोकशाहीचा पाळणा उद्या हालणार आहे. उद्या तुमच्या वाटेत कोणीही येणार नाहीत, फ्लोअर टेस्टसाठी या. शिवसैनिकांना आवाहन आहे की, उद्या कोणीही गोंधळ घालू नये. ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली खेचण्याचे पुण्य जर त्यांच्या पदरात पडत असेल तर त्यांना ते मिळू दे, अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे

  • येवढे वर्षे आम्ही बोलत होतो पण आम्ही शेतकऱ्यांनी कर्जमुक्त केल्याचे आनंद आहे.
  • स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवले ते नाव आपण संभाजीनगरला दिले आहे.
  • पुढची वाटचाल सगळ्यांच्या आशिर्वादाने सुरू राहील. औरंगाबादच्या नामांतरावरून मला आनंद वाटला.
  • साधी साधी माणसं आम्हाला प्रोत्साहन देत राहिली. ज्यांना दिलं ते नाराज आहेत, ज्यांना नाही दिलं ते खूष आहेत याचं वाईट वाटतं.
  • कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे आता न्यायालयाचा मान राखला पाहिजे, उद्या बहुमताला सामोरं जावं लागणार आहे, लोकशाहीचं पालन झालंच पाहिजे. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानतो
  • काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी पण बैठकीनंतर सांगितले, की तुम्ही नाराज होवू नका आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो.
  • केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबईत येईल याची लाज वाटते. एवढी लाज सोडली? पण आमचा शिवसैनिक त्यांना कसलाच त्रास देणार नाही.
  • उद्या लोकशाही जन्माला येतीय त्याचाच पाळणा हलतोय.
  • उद्याच्या शिवसैनिकांना कुणीही आडवं येवू नये. तुम्हाला कोणीही अडवणार नाही.
  • उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्याची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही.
  • मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तसेच विधानपरिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देत आहे.
  • आता मी फक्त शिवसेनेचीच धुरा संभाळणार आहे.
Local ad 1